Bookstruck

दोन बेडूक

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका मोठ्या तळ्यात दोन बेडूक रहात असत. एक वर्षी उन्हाळा इतका कडक पडला की, त्या तळ्यातले पाणी आटून गेले. तेव्हा ते दोघे पाण्याच्या शोधार्थ दुसरीकडे निघाले. जाता जाता त्यांना एक खोल विहीर लागली. तिच्यात भरपूर पाणी होते. ते पाहून एक बेडूक दुसर्‍याला म्हणाला, 'मित्रा, इथे भरपूर पाणी आहे. आपण इथेच उड्या टाकू.' तेव्हा दुसरा बेडूक म्हणाला, 'अरे, इथे पाणी भरपूर आहे हे खरं आहे. आपण या विहिरीत उतरल्यावर त्यातलं पाणी आटलं तर आपण पुन्हा वर कसे येणार ?'

तात्पर्य

- कुठलीही गोष्ट पूर्ण विचार केल्याशिवाय करू नये.
« PreviousChapter ListNext »