Bookstruck

डुकरी आणि मांजरी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एक डुकरी आणि एक मांजरी यांचे एकमेकांच्या मुलांविषयी बोलणे चालले होते, बोलता बोलता मांजरी गर्वाने म्हणाली, 'मलाही देवाच्या दयेने इतरांप्रमाणे पुष्कळ मुलंबाळं आहेत. माझंही कुटुंब काही लहान नाही.'

त्यावर तुच्छतेने डुकरी म्हणाली, 'असतील, पण तू आपल्या मुलांना इतक्या घाईघाईने जन्माला घालतेस की, त्यामुळे ती आंधळीच निपजतात.'

तात्पर्य

- घाईघाईने केलेली कामे बहुधा अर्धवटच रहातात.
« PreviousChapter ListNext »