Bookstruck

शिंपले

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

समुद्रकाठी राहणारे लोक शिंपल्यातले मांस खातात. एकदा आतले मांस काढून घेतलेला एक मोठा शिंपला समुद्रकिनार्‍यावर पडला होता. तो सूर्यप्रकाशात चकाकत होता. तो शिंपला पाहून एक लहान शिंपला आपल्या आईला म्हणाला, 'आई, हा शिंपला किती तेजस्वी नि सुंदर आहे, पाहिलास का ? सौंदर्यात व चकचकीतपणात याची बरोबरी समुद्रात दुसरा कोणीही करू शकणार नाही. आई, मी याच्याइतका मोठा होऊन याच्यासारखं दिसायला अजून किती वर्षं लागतील कोण जाणे !' इतकी वर्ष वाट पाहता पाहता मी अगदी कंटाळून जाईन.' त्यावर त्याची आई म्हणाली, 'अरे वेड्या पोरा ! ह्या शिंपल्याची अशी स्थिती होण्यास त्याचं सौंदर्यच कारण झालं आहे, हे लक्षात आहे ना ? तू जर ह्याच्यासारखा लठ्ठ होऊन चकाकू लागशील तर तुझं मांस खाण्यासाठी लोक तुला मारून टाकतील. तेव्हा जो मोठेपणा तुझ्या नाशाला कारण होईल त्याची अपेक्षा तू कशाला करतोस ?'

तात्पर्य

- लहानपण दे गा देवा । न चले कोणाचाही हेवा ॥
« PreviousChapter ListNext »