Bookstruck

शेतकरी आणि उंदीर

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

एक शेतकरी फार विनोदी होता. एकदा दुर्दैवाने त्याच्या घराला आग लागली असता घरातला एक उंदीर आपला जीव वाचविण्यासाठी धडपडत बाहेर आला. तो आता पळून जाणार तोच त्या शेतकर्‍याने पकडून त्याला पुन्हा आगीत टाकले व म्हणाला, 'अरे ज्याने तुला आजपर्यंत खाऊ घालून तुझं पोषण केलं त्या तुझ्या मित्रावर हा वाईट प्रसंग आला असता यावेळी तू त्याला सोडून जातोस, या तुझ्या कृतघ्नपणाला काय म्हणावे.'

तात्पर्य

- स्वतःचा जीव वाचविण्यासाठी माणूस सगळ्या पुण्याईवर व सद्‌गुणांवर पाणी सोडायला तयार होईल.
« PreviousChapter List