Bookstruck

अव्यक्त भावना

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आम्ही कितीही चिडलो तरी लगेच कोणी मनवायला येत नाही
चिडलो की किंवा नाही कोणाला काही फरक पडत नाही
म्हणूनच माझ्या मनात काय चालु आहे हे मला कधीच सांगता येते नाही
काय प्रोब्लेम आहे हे जर सांगता येत असत
तर मग जवळच माणूस कशाला लागल असत
जवळच्या माणसांची किम्मत कधीच करता येत नाही
म्हणूनच माझ्या मनात काय चालु आहे हे मला कधीच सांगता येते नाही
सगळ्यांची मन जपण्याच्या नादात स्वतःलाच गेलीय विसरून
जे क्षण छातीला कवटाळायचे तेच नेमके गेले निसटून
सगळ्यांना जपताजपता स्वतःच अस काही उरलच नाही
म्हणूनच माझ्या मनात काय चालु आहे हे मला कधीच सांगता येते नाही
उरता उरल ते चेहेऱ्यावरच हास्य
मनात नसताना कराव लागणार खोट भाष्य
दुसऱ्याना कधी दुःखवताच येणार नाही
म्हणूनच माझ्या मनात काय चालु आहे हे मला कधीच सांगता येते नाही
आपल्याला कोणीतरी आवडत असल
पण जर ते बोलायच धाडस नसल
मग वाटत जग आपल्याकडे बघुन हसल
नुसत आपल्याला आवडल म्हणून ते कधी मिळत नाही
म्हणूनच माझ्या मनात काय चालु आहे हे मला कधीच सांगता येते नाही
स्वतःहून आपल्याला ओळखणार कोणीतरी असाव
आपणही कधीतरी रुसुन कोपऱ्यात बसाव
रुसलेल दिसूनही कोणी रुसवा काढायला येणार नाही
म्हणूनच माझ्या मनात काय चालु आहे हे मला कधीच सांगता येते नाही

« PreviousChapter ListNext »