लागलय मला वेड पण ते कोणासाठी
लागलय मला वेड पण ते कोणासाठी
कायम मीच चुकते
प्रत्येक वेळेला वाट बघते
डोळे झाकून विश्वास ठेवते
लागलय मला वेड पण ते कोणासाठी
मलाही कधीतरी वाटत
मग पाणी डोळ्यांत दाटतं
कधीतरी दिलेला शब्द पाळवा
मनाला माझ्या थोडातरी उसंत मिळावा
लागलय मला वेड पण ते कोणासाठी
मीच मुर्ख
आपापल्या कामात सगळेच गर्क
उगाचच लावत बसते तर्क
का कळत नाही काही क्षण झालेत खर्च
लागलय मला वेड पण ते कोणासाठी