पाऊस असा कोसळतो
पाऊस असा कोसळतो
जसा तोही मला ओळखतो
पाऊस असा कोसळतो
ती रिमझिम त्याची धून
मना भुलवून जाते खूण
पाऊस असा कोसळतो
ते अचानक त्याचे येणे
मना धुंद करूनी जाणे
पाऊस असा कोसळतो
ती टीपटीप डोळ्यांतील धार
हा भास कधी की हार
पाऊस असा कोसळतो
ते रौद्र रूप त्याचे
भाव की भावना यांचे
पाऊस असा कोसळतो
आपणही त्यात मिसळतो
मिसळता मिसळता सगळे विसरतो
पाऊस असा कोसळतो
तू येण्याचा किंचितसा होतो भास
तरीच तू माझ्यासाठी खुपच खास
पाऊस असा कोसळतो
तो गरजतो
तो बरसतो
पण
पाऊस असाच कोसळतो