उघड्या डोळ्यांनी बघीतलेल स्वप्न
तू येण्याची कोणीतरी वाट बघावी
शांत धुक्यात उगवणारी रम्य पहाट असावी
तुज संगती प्रिया मी निवांत
असा तुझ्या कवेत कधीतरी मिळावा एकांत
तुझा स्पर्श होता खुलते कळी माझी
तूच खरा माझा मजपाशी
तुझ्याचसाठी हे सर्व काही माझे
तूच मला सर्वतोपरी साजे
तूच माझी लय तूच माझा ताल
आपला हा प्रवास सुरु झालाय काल