सहवास
तुझा सहवास असा जशी वऱ्याची झुळुक
वऱ्याच्या झुळूकेसोबत ते तुझे येणे
तू येताना घेऊन येतो आनंद
क्षणात सारे क्षण सुखाचे हाच परमानंद
तू जाताना पटकन जातो निघुन
माझे मन तरीही भरत नाही तुला बघुन
वाटते राहावे तुझासोबत कायम
वेळेबरोबर चालावे लागते हाच जगाचा नियम
नियमालाही असतो कधीतरी अपवाद
वेळ पटकन का सरतो हा आपला नेहमीचाच वाद
तुझ्या आठवणीत घलवालेला प्रत्येक क्षण
आठवावा सरखा मनोमन
काळात नाही अस का असत?
चांगले क्षण सरतात क्षणांत
फक्त त्या आठवणी उरतात मनात
तुझ्या सहवासची ओढ लागते
मी तुझी कायम वाट बघते