Bookstruck

संत बहिणाबाईचे अभंग

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

नेणें जप तप नेणें अनुष्ठान । घालावें आसन कळेना तें ॥ १ ॥

ध्यानाचें लक्षण इंद्रियांचारोध । नाहीं याचा बोध ऐकियेला ॥ २ ॥

पाषाणप्रतिमा विठोबाचें ध्यान । ह्रदयीं चिंतन राममुद्रा ॥ ३ ॥

तुकारामकथा करावी ती द्वारीं । ऐसा हा अंतरीं हेत होता ॥ ४ ॥

« PreviousChapter ListNext »