1... जय जय कृष्ण कन्हैया
जय जय कृष्ण कन्हैया मुरारी
परब्रह्म हरी स्वामी माझा
भाव तोची एक असेबा अंतरी
राम कृष्ण हरी पांडुरंग
पांडुरंग हरी केशव माधव
सर्व आधी देव माझा हरी
त्रिलोक्यनाथ प्रभू नारायणा
तुझीया चरणा जागा देई
गोविंद श्रीहरी गोपाल श्रीहरी
वदे ती वैखरी आनंदाची
- आचार्य अण्णा महाराज (अंचाडे)