2... प्रभूनामा बळे
प्रभू नाम गाऊ शुद्ध मनोभावे
तल्लीन ते होय मन तेने
हरी नाम जान स्वर्गाचीच गंगा
दोष होती भंगा नाम घेता
रुप मनोहर कितीबा चांगले
सहस्त्र प्रकाशले सुर्य जैसे
हरी रुप नाम प्रकाशित भारी
दुःखाच्या डोंगरी मार्ग दिसे
आनंदा तो म्हणे प्रभूनामा बळे
आत्मतेज वाढे सुर्य कोटी
- आचार्य अण्णा महाराज (अंचाडे)