3... आत्मा हाची मित्र
जानी जगी सत्य ईश्वराचे गुण
असत्य ही मान माया सारी
खरा संत देव आहे तुझ्यापाशी
वसे हृदयासी आत्मा तुझा
आत्मा हाची मित्र देई जीवा साथ
आधी, मध्य, अंत काळी रक्षी
आनंदा तो म्हणे आत्मज्ञान श्रेष्ठ
जाई बा अरिष्ट बोध होता
- आचार्य अण्णा महाराज (अंचाडे)