8... गर्व हा फजिती करितसे
गर्वापायी झाला रावणाचा अंत
कौरव ते सारे वाया गेले
गर्व आला होता विश्वमित्र भक्ता
हरिचंद्रास गांजिता खिन्न झाला
गर्व भार वाहे भिमसेन बळी
मारुतीने वेळी खिन्न केला
हारले गर्विष्ट थोर-थोर व्यक्ती
गर्व हा फजिती करितसे
दास तो आनंदा गातो भोळा भाव
केशव माधव सुचवित
- आचार्य अण्णा महाराज, अंचाडे