7... जगी बा जगावं सत्यासाठी
जाणुनीया वेळ उचली पाऊल
जगी चाली चाल शुद्ध मार्गी
गर्व तो नसावा असो नम्र भाव
जगी बा जगावं सत्यासाठी
गर्व नासाडीत चरित्र अवघे
मानहानी घ्यावी लागे जनी
आनंदा तो म्हणे अभंग सुचक
हाच जगी ठिक मार्ग सोपा
- आचार्य अण्णा महाराज, अंचाडे