6... अहंकार त्यागुनी
नम्रता ती बाई मिटवी कल्लोळ
विघ्न ते तत्काळ स्थिर करी
येता हो अरिष्ट धीर धरी पक्का
तया सोडू नका काळ वेळी
सत्य, धैर्य बंधू रक्षक जीवाचे
दूत हो देवाचे तया मानी
अहंकार त्यागुनी दयाभूती घेसी
होसी रहिवासी स्वर्गाचा तू
आनंदा तो म्हणे अभंग सुचक
त्यात सर्व ठिक शुद्ध गुण
- आचार्य अण्णा महाराज, अंचाडे