5... वाईट विकारे घडे महादोष
सदभाव शुद्ध असो हृदयास
त्याने बा उल्हास वाटे जीवा
देह हे मंदिर असो बा सुंदर
विषय विकार सांडी तया
वाईट विकारे घडे महादोष
जीवा बहू त्रास दुःख होई
दास तो आनंदा म्हणे नर जन्मी
शांती हो सत्कर्मी नांदतसे
- आचार्य अण्णा महाराज (अंचाडे)