Bookstruck

दत्ताची आरती - जयजय श्रीदत्तगुरू आरती तु...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

जयजय श्रीदत्तगुरू आरती तुला ।

ओंवाळित प्रेमभरे तारि तूं मला ॥ धृ. ॥

तव भजनी मग्न सदा तारी पामरा ।

दुष्ट जनां दंड करूनि मज रक्षि मन बरा ॥

पाप लया नेई जसे अग्नि कर्पुरा । हारी ॥ वारी ॥ वारी ॥ जगतरण । ह्या शरणा ।

वरि करुणा । करि सुनिर्भुला ॥ जय. ॥ १ ॥

बाळकृष्ण कवि तुजला विनंति ही करि ।

सद्‌गुरु तव दर्शन मज देई झडकरी ॥

इच्छा मम हीच असे पूर्ण ती करीं ॥ धावें ॥ यावें ॥ पावें ॥ करुनी त्वरा ॥

भक्तवरा ॥ मुक्त करा ॥

भो प्रभो मला ॥ जय. ॥ २ ॥

« PreviousChapter ListNext »