मैत्री
मैत्री करता आली पाहिजे
मैत्री कोणाशी पण होते.
मैत्री सुंदर फुलांशी , टोकदार काट्यांशी ,
खडकाळ डोंगरांशी , वाहणाऱ्या नदीशी
मैत्री करता आली पाहिजे
मैत्री कोणाशी पण होते .
मैत्री सुगंधी मातीशी , अफाट आकाशाशी ,
हवेच्या झुळकेशी ,सोसाट्याचा वारयाशी
मैत्री करता आली पाहिजे
मैत्री कोणाशी पण होते.
मैत्री शांत चंद्राशी ,उष्ण सुर्याशी ,
कठोर दगडाशी ,मऊ मातीशी
मैत्री करता आली पाहिजे
मैत्री कोणाशी पण होते.
मैत्री घाबरट सश्याशी ,निडर वाघाशी ,
छोट्या चिमणीशी, मोठ्या घारिशी
मैत्री करता आली पाहिजे
मैत्री कोणाशी पण होते .
जसा निसर्ग तसे आपण रे ,
दोघ एकाचीच लेकरे ,
मनातला राग ,
दाखाल्या वरची जात काढ ,
तू आणि मी सर्व एक रे .
मैत्री करता आली पाहिजे
मैत्री कोणाशी पण होते.