साद
कोणी सादला दाद देत नाही
या सिमेंट काँक्रेटच्या जगात
माणुस मानव नाही
जंगलामधील पक्षी सादला दाद देतात
मुकी झाडे सुद्धा दाद देतात
कोणत्या गुर्मित मानव साद ऐकत नाही
ऐक जरा साद या व्याकूळ मनाची
एकटाच किती वर जाशिल
दे एक साद निर्पेक्षतेची
येथे न कोणी आपले न परके
सादला साद देइ तो आपला
आज साद ला दाद देत नाही
पूत्र बापाला
सादला दाद मिळत नाही
म्हणून साद देणे थांबवणार नाही
मानव यंत्र झालेल्या जगात
माणूसकी शोधत राहीन
साद देत जाईल...