Bookstruck

भारतातील इतर प्रांतातील नवरात्र

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

गुजरात

गरबा खेळणे म्हणजे काय ? गरबा खेळणे म्हणजे टाळयांच्या किंवा बहुधा लाकडी दांड्यांच्या लयबद्ध गजरामध्ये देवीची भक्तिरसपूर्ण गाणी म्हणणे. टाळयांच्या माध्यमातून श्री दुर्गादेवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडासाठी कार्य करण्यासाठी मारक रूप घेण्यास आवाहन करणे हा उद्देश असावा. टाळीच्या आघातातून तेजाची निर्मिती होते, अशी श्रद्धा आहे. टाळ्यांमुळे देवीच्या मारक रूपाला जागृत करणे शक्य होते. तसेच टाळया वाजवून गोलाकार फेर धरून देवीला आवाहन करणारी भक्तियुक्‍त भजने म्हटल्याने देवीप्रति भाव जागृत होण्यास मदत होते. गरब्याच्या वेळी गोलाकार फेर धरून केलेले मंडल हे घटाचे प्रतीक असते. यामध्ये छिद्र असलेल्या रंगीबेरंगी मातीच्या घड्यात दिवे लावले जातात आणि त्याभोवती गोलाकार नाचण्याची पद्धती अनुभवाला येते.गुजरातेत अशा प्रकारचा उत्सव परंपरेने साजरा केला जातो. त्याला दांडिया (नृत्य) म्हणतात.

दांडिया किंवा दांडिया रास हे गुजरातमधील लोकनृत्य आहे. हे समूहनृत्य सहसा नवरात्रात नाचले जाते. गुजरातमध्ये कोणत्याही सणाला किंवा शुभप्रसंगी हे नृत्य करण्याची परंपरा आहे.

दांडियाचे उपप्रकार

पनघट
पोपटीयो
हुड्डा
हिच

याशिवाय गुजरातमधील गावांच्या नावावरुनदेखील प्रकार आहेत जसे:

अहमदाबादी दोडियो (अहमदाबादचा)
बरोडो दोडियो (बडोद्याचा)
सुरतला (सुरतचा)

वरील शहरांमध्ये यासाठी प्रख्यात शिकवणी वर्ग आहेत.

« PreviousChapter ListNext »