भाग 2

इतकी सुंदर रूपवान मुलगी पाहून, न रहावता तिने घरात घेतले. अर्जुन ने तिला निशा शी ओळख करून दिली. निशा फारच गोड मुलगी होती. ती अर्जुन सोबत त्याच्या ऑफिस मध्ये काम करत होती. सुदैवाने बाकी सर्व गोष्टी, पत्रिका..बोलणी वगैरे सुरळीत पार पडून निशा चा गृहप्रवेश झाला.

किती आनंदी होती सुलेखा !! जणू विश्वातील सर्वात सुखी तीच!! नवे लग्न, नवे नाते, नवे लोकं पण निशा ने सगळ्यांना आपलेसे करून घेतले. सकाळी लवकर आवरून तिला अर्जुन सोबत ऑफिस ला निघायचे असे म्हणून सुलेखा दोघांचे हि डबे तयार ठेवायची. मग स्वतः तयार होऊन ऑफिस ला यायची. पहिलं वर्ष तर कसं गेलं कळलंच नाही. आताशी सुलेखा ला गुडघे दुःखी सुरु झाली होती, ती बरेच वेळा रजेवर हि रहात असे. शारीरिक त्रासात मन अधिक आजारी बनतं. सुलेखा च असंच होत होतं. स्वाभाविकपणे ती निशा कडून मदतीची अपेक्षा करू लागली.

ऋतू बदलावा तसा निशा चा स्वभाव पण बदलला...घरात, कामात तीच मन तर कधीच नाही लागलं. कधी दूध गॅस वर ठेऊन निघून जाणार, कधी दाराला कुलूप न लावता च जाणार. आताशी ती बाहेर च जास्त राहू लागली होती. ऑफिस मध्ये ओव्हरटाईम कधी तर कधी ऑफिस ची पार्टी. हल्ली अर्जुन देखील आई शी बोलणं, बसणं टाळतोय असं जाणवू लागलं होतं तिला.

काल चा दिवस त सुलेखा कधी च विसरू शकणार नाही. तिच्या ऑफिस मध्ये auditors येणार होते म्हणून तीला लवकर जायचे होते. तिने निशा ला सकाळी लवकर उठून जरा मदत करशील का विचारलं. झालं. किती चिडली निशा, आणि काय नाही नाही ते बोलली सुलेखा ला. भरीस भर अर्जुन ने आई ला खूप सूनवले. दिवसभर सुलेखा विचार करीत होती की असं काय बोलली कि इतकं रामायण झालं. तिने दिवसभर अन्नाचा कण हि नाही घेतला. रात्रभर विचार करून डोकं जड झालं होतं तीचं. पण अर्जुन निशा ला त्याच्याशी काहीच संबंध नव्हता. ते त्यांच्या च routine मध्ये busy होते.