<p dir="ltr">तिने निशा ला सकाळी लवकर उठून जरा मदत करशील का विचारलं. झालं. किती चिडली निशा, आणि काय नाही नाही ते बोलली सुलेखा ला. भरीस भर अर्जुन ने आई ला खूप सूनवले. दिवसभर सुलेखा विचार करीत होती की असं काय बोलली कि इतकं रामायण झालं. तिने दिवसभर अन्नाचा कण हि नाही घेतला. रात्रभर विचार करून डोकं जड झालं होतं तीचं. पण अर्जुन निशा ला त्याच्याशी काहीच संबंध नव्हता. ते त्यांच्या च routine मध्ये busy होते. </p>