Bookstruck

मराठी वाचवा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


➖➖➖➖➖➖➖➖
मराठी वाचवा ,मराठी टिकवा .

आजच्या पिढीला मायबोली मराठीचे महत्व पटवून द्यायची वेळ येऊन ठेपली आहे . हेच मोठे दूर्दैव ! आपल्या मायबोली मराठीचे महत्व नुसते लिहून आणि वाचून  चालणार नाही .
ते आपण आत्मसाद करुन आचरणात ही आणले पाहिजे ‌. आज महाराष्ट्रात जागोजागी  मराठी शाळा बंद पडू लागल्या आहेत . याला कारण आपली आपल्या मायबोलीवरची कमी झालेली निष्ठा . 
   आजकाल आपण पाहतो अडीच ते तीन वर्षाच्या लहान मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत टाकण्याचा पालकाचा अट्टहास असतो .  घरात बोली भाषा मराठी असताना एवढ्या लहान वयात मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत टाकले तर त्यांच्या कोवळ्या मन बुध्दिवर ताण पडणे सहाजिकच आहे .  सर्वसामान्य घरातील बोली भाषा मराठी . घरात तुटक तुटक इंग्रजी बोलले जाते  पण पुर्णपणे बोलीभाषेत इंग्रजीचा वापर होत नसल्याने . अडीच तीन वर्षाच्या लहान मुलांना शाळेत शिकवला जाणारा इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रम आकलनात लवकर येत नाही . आपण पाहतो इंग्रजी माध्यमात शिकणार्या मुलांना सिनिअर के.जी. पासून शिकवण्या लावण्यात जातात . त्यामुळे कोवळ्या वयातच अभ्यासाचा अतिरिक्त ताण त्यांच्या बाल मनावर पडत असतो . या उलट मराठी शाळेत जाणारे लहान मूले शाळेत शिकविला जाणारा  बोली भाषेतील अभ्यासक्रम सहज आकलन करतात .
घरात मुलांशी पूर्णपणे इंग्रजीतून संभाषण कले गेले पाहिजे तरच इंग्रजी माध्यमातील मुलांना शाळेत शिकवलेले सहज समजू शकेल .
पण आजच्या युवापिढीला आपल्या मुलांना मराठी शाळेत घालणे कमी पणाचे वाटू लागले आहे .  मोल मजूरी करणारे अशिक्षित मजूर सुध्दा आपल्या मुलांना इंग्लिश माध्याच्या शाळेत टाकतात . ज्यांना साधी सही करता येत नाही ते आपल्या मुलांचाअभ्यास इंग्रजीतून कसा घेतील ? विचार करण्यासारखी बाब आहे .
  मुलांना फक्त योग्य प्रोत्साहानाची गरज असते . शुन्यातून विश्व निर्माण करण्याची शक्ती आपोआप त्यांच्यात निर्माण होत असते .
आपल्या मराठीला छान असा शब्दकोश आहे तरीही आपल्या बोली भाषेत इंग्रजी शब्दांचा वापर करणे म्हणजे  सुशिक्षितपणाचे आणि प्रतिष्ठेचे समजले जाते . मुलांना आईला मम्मी आणि बाबांना पप्पा म्हणायला शिकवले जाते . मुलांनी जर आई म्हणून हाक मारली तर सुशिक्षितपणा कमी होतो का ?  दुसर्या देशात जाऊन पहा प्रत्येक देशात आपापल्या बोली भाषेतील शाळेतच मुलांना घातले जाते . प्रत्येक घरात आपापल्या देशाचीच बोलीभाषा अभिमानाने बोलली जाते . आणि आम्ही असे कपाळ करंटे आम्हाला मराठीत बोलायला इंग्रजी शब्दांची जोड लागते .  ज्या मातीत आपण जन्मलो त्या मातृभाषेची आपल्याला लाज का वाटावी ?आरक्षणासाठी जागोजगी  झेंडा घेऊन रस्त्यावर उतरलेल्या महाराष्ट्रीयन  बांधवांनी आपल्या ह्रदयावर हात ठेवून स्वत:ला एकच प्रश्न विचारावा मी घरात किंवा घराबाहेर बोलतांना मराठी भाषेचा पूर्णपणे वापर करतो का ? माझे मुल मराठी शाळेत जाते का ?  तुम्ही हक्कासाठी लढा जरुर लढा पण एक लढा आपल्या इंग्रजी भाषेला बळी पडलेल्या मनाशी द्या .
आपली बोली भाषा मराठीला आपणच जपले पाहिजे . नाहितर कालांतराने  'मराठी' हा शब्द आपल्याला फक्त इतिहासाच्या पुस्तकात पहायला मिळेल तोही इंग्रजीतून . 
आपल्या महाराष्ट्राला मराठी मातीला थोर संतांनी दिलेला मराठी मायबोलीचा वारसा आपणच जपायला हवां .
' मराठी वाचवा , मराठी शिकवा
मराठीतच बोला , महाराष्ट्राचे मराठीपण टिकवा '. 
©®✍सौ . सुवर्णा सोनवणे .
चाळीसगाव .

« PreviousChapter ListNext »