Bookstruck

शुभेच्छा एका चिमुकलीला

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मनीषा पिंटू वराळे
धरणगुत्ती

चिमुकल्या स्पर्शाने जीव शहराला
तिच्याच येण्याने धीर मला मिळाला
आयुष्यात असा ...... खरा अर्थ आला

माझीच सावली माझाच आधार झाला
उदास मनाला तिनं मायेचा हात दिला
अश्रूंच्या धारांना..... ममतेचा आधार दिला

कधी हसवून.... कधी वाकुल्या दाखवून
माझी चिमणी..... खरे धाडस करून
देते सामंजसाचा इशारा पटवून

लहानगीच पण दिसते आजी शोभून
असं तिचं ज्ञान बघून, जाते मी हरवून
लिहावं वाटलं... आज तिच्यासाठी म्हणून

अशी निरागस, माझी बाल्या जाते हसून
आईच्या घे शुभेच्या, तुझा वाढदिवस म्हणून
सुखाने रहा सदैव, जाते मी सांगून

कठीण परिश्रमाला नको जाऊ तू घाबरून
प्रयत्नातून घे यश असे जिंकून
यश असे जिंकून

« PreviousChapter ListNext »