Bookstruck

'ती' अशक्त नाही

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

राज धुदाट
(8485877232) जयसिंगपूर (कवितासागर)

नकोरे समजू तिला अशक्त
तिच्या नसानसात आहे तुझेच रक्त

मुलगाच  पाहिजे हा हट्ट तू का धराला
तुझा जन्म स्त्रीच्याच पोटी झाला हे कसा रे विसरला

बनेल तीही कोणाची बहिण, बायको आणि सासू
येऊ देऊ नकोरे तिच्या डोळ्यात एकही आसू

कमी पडू देऊ नको तिला शिक्षणात काही
पुरव तिला पुस्तक, पाटी, सर्वकाही

शिक्षणाबरोबर जोड असू दे संस्कारांची
जोडेल ती माणसे  सासरची आणि माहेरची

मुलगी मुलापेक्षा काही कमी नाही
मुलगाच काळजी घेईल याची हल्ली हमी नाही

ज्यांना मुलच नाही त्यांची जरा आठवण कर
देवाने तुला आशीर्वादित केलं म्हणून त्याचं स्तवन कर

« PreviousChapter ListNext »