Bookstruck

राम-रहीम 7

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

त्या दिवशी काँग्रेसचे काही स्वयंसेवक भिक्षेसाठी हिंडत होते. काँग्रेसचे प्रचारक ठेवता यावेत म्हणून ही भिक्षा ते मागत असत. रामाच्या दारी आले ते. राम घरातून ताम्हणभर गहू घेऊन आला; तो तिकडून शंकरराव आले. ''या धर्मद्रोह्यांना एक दाणाही येथे मिळणार नाही. निघा येथून-'' ते गरजले. राम तेथे थरथरत उभा होता. स्वयंसेवक निघून गेले. पितापुत्रांचा संवाद झाला.

शंकरराव : कोणी सांगितले हे तुला ?

राम : हिंदुधर्मांने. दारात कोणीही येवो, त्याला देव मान, असे हिंदुधर्म सांगतो. हिंदुधर्माचा मोठेपणा तुम्ही नष्ट करीत आहात.

शंकरराव : त्या मोठेपणामुळेच समाज मरत चालला. फकीर आला, घाल भिक्षा. अमुक आला, घाल भिक्षा.

राम : हे तरी निदान फकीर नव्हते !

शंकरराव : फकीर पत्करले. परंतु हे कु-हाडीचा दांडा गोतास काळ असे नकोत.

राम : त्या दिवशी त्या सार्वजनिक विहिरीवर हरिजन पाणी भरू लागले; तेव्हा काँग्रेसचे लोक तेथे गेले. तुम्ही हिंदुमहासभावाले कोठे मेले होतेत ? श्री. सावरकरांचे तरी ऐका. परंतु तेही तुम्हांला पचत नाहीत. येथील मंदिरांतून हरिजनांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह करा. तुम्ही घरच्या विहिरीवर त्यांना पाणी भरू द्या. तुम्ही त्यांना घरात घ्या. सार्वजनिक ठिकाणी त्यांची अस्पृश्यता राहू नये म्हणून खटपट करा. चालले हैदराबादला. स्वतःच्या हरिजनांना माणुसकी मिळावी म्हणून करा हजारोंनी सत्याग्रह. बाबा, तुमचा दंभ आहे. काँग्रेसला शिव्या देणे एवढाच तुमचा धर्म.

शंकरराव : मला बुध्दिवाद नको. तू या घरातून जा. काळे कर तोंड !

राम : बरे बाबा.

शंकरराव : कोणी सांगितले हे तुला ?

रहीम रडत होता.

राम : रहीम काय झाले ?

« PreviousChapter ListNext »