Bookstruck

नरहरी जपे ह्रदयांत

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पहा दिसतो पदार्थ । अवघा नाशिवंत व्यर्थ ॥ १ ॥

माया बहुरूपी नटली । नवखंडी प्रगटली ॥ २ ॥

प्रपंच हें माया जाळ । घातलें भ्रांतीचें पडळ ॥ ३ ॥

उमज पडेना हो कांहीं । मस्तक सद्‍गुरूचे पायीं ॥ ४ ॥

सद्‌गुरुनाम हें अमृत । नरहरी जपे ह्रदयांत ॥ ५ ॥

« PreviousChapter ListNext »