Bookstruck

गोकुळी लाघव गौळीयांचे घरी...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

गोकुळी लाघव गौळीयांचे घरी । रांगता श्रीहरी स्वयें झाला ॥१॥

दही दूध लोणी चोरोनियां खाये । नही म्हणोनि वाहे आण माते ॥२॥

गाई चारी सुखें करीतसे काला । ठकवी देवाला ब्रह्मादिकां ॥३॥

वंका म्हणे ऐसा लाघवी सूत्रधारी । किर्ति चराचरी वाढलीसे ॥४॥

« PreviousChapter ListNext »