Bookstruck

नवी दृष्टी 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''दौलती नि मी तर एकमेकांचे तोंड पहात नाही.''
''तुम्ही मोठी माणसे. आम्ही लहान मुले.''
''आज तुझी प्रार्थना देव ऐकेल.''
''बरा आहे जयंता?''
''ताप वाढला आहे. मी डॉक्टरांकडे जात आहे.''

''मीच जातो. तुम्ही त्याच्याजवळ बसा.'' असे म्हणून रवि पळतच गेला. डॉक्टर आले. तो काय आश्चर्य? जयंताला थंडा घाम येत होता.

''ताप उतरणार.'' डॉक्टर म्हणाले. काही औषध देऊन डॉक्टर गेले. रवि खोलीच्या बाहेर होता.

''ये रवि आत ये.'' आनंदराव म्हणाले.
''जयंता रागवेल.'' रवि म्हणाला.

''नाही रागवायचा.'' पिता म्हणाला. परंतु रवि निघून गेला, जयंताला घेऊन आनंदराव घरी गेले. मुलाला बरे वाटत होते. परंतु जयंताचे वर्ष फुकट जाणार होते. त्याला परीक्षेस बसता येत नव्हते.

''वाईट नको वाटून घेऊ बाळ.'' पिता त्याला समजावी.
''रवि पुढे जाईल. लोक तुमची आणखी फजीती करतील. म्हणतील दौलतीचा मुलगा चालला पुढे'' जयंता म्हणाला.

''रवि तुझा मित्र आहे.'' पिता म्हणाला.

''तुम्ही नि दौलतराव मित्र बनाल तर पुन्हा आम्ही मित्र बनू. तुमच्यासाठी मी रविला दूर केले. मला त्याची रोज आठवण येते. तापातही तो दिसे.''
''तो तुझ्यासाठी प्रार्थना करी. त्यानेच फूल आणून दिले होते.''
''तुम्ही सांगितले का नाही?''

« PreviousChapter ListNext »