Bookstruck

चिटुकल्या गोष्टी 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पांखरू उडाले :

''आज तुम्ही गोष्ट गोष्ट करीत आहोत. पाऊसही पडत आहे. गोष्ट तर सांगायला हवी. छोटी चालेल का?''

''चालेल.''

''ऐका तर. अगदी लहान मुलांची गोष्ट. बहीण भाऊ खेळत होती. चेंडू आपटला की वर जायचा.'' भाऊ बहिणीला म्हणाला, ''ताई, यात पाखरू आहे कोंडलेले. आपण चेंडू आपटला की ते पंख फडफडवते व चेंडू वर उडतो. आपण त्या पाखराला सोडू. ये.''

ताई म्हणाली, ''खरंच दादा. किती त्रास होत असेल त्या पाखराला आपण हळूच भोक पाडू. आतल्या पाखराला तर लागता कामा नये. मी आधी नुसती सुई टोचून पाहते.''

तिने सुई टोचली. चेंडू जरा बारीक झाला. त्यांनी तो आपटला. तो वर उडेना.

भाऊ म्हणाला, ''ताई, पाखरू उडून गेले की काय? चेंडू उडत नाही.''

ताई म्हणाली, ''गेले असावे उडून. परंतु उडताना दिसले नाही. सुईच्या लहानशा भोकातून का गेले? काही असो. गेले बिचारे. छान झाले नाही?''

''हो छान झाले. पाखरू उडाले.''

दोघेजण नाचूं लागली. संपली गोष्ट.

''अशी काय ही गोष्ट! अगदीच लहान दुसरी सांगा.''

''कोणाची सांगू? झाडामाडाची की भुताखेताची? थोरामोठयांची की छोटयाछोटयांची? नवलकथा सांगू की सत्यकथा?''

« PreviousChapter ListNext »