Bookstruck

बोधीवृक्ष

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

बोधीवृक्ष किंवा महाबोधी वृक्ष म्हणजेच 'ज्ञानाचा वृक्ष' (Knowledge Tree) होय. बोधगया येथील महाबोधी विहाराच्या पश्चिमेला जो पिंपळ आहे, तोच महाबोधी वृक्ष या नावाने प्रसिद्ध आहे. या पिंपळाच्या वृक्षाखाली सिद्धार्थाला इ.स.पू. ५२८ मध्ये वयाच्या ३५ व्या वर्षी संबोधी (ज्ञान/बुद्धत्व) प्राप्ती होऊन ते बुद्ध बनले, तेव्हापासून पिंपळांच्या झाडाला बोधीवृक्ष संबोधिण्यात येते. ज्या स्थानी बुद्धांना संबोधी प्राप्त झाली, त्या जागी वज्रासनाचे प्रतीक म्हणून एक विस्तीर्ण लाल शिलाखंड एका चबुतऱ्यावर बसवलेला आहे. सम्राट अशोक बुद्धांचा अनुयायी झाला व नित्यनियमाने बोधीवृक्षाचे दर्शन घेऊ लागला. तेव्हा त्यांची पत्‍नी राणी तिश्यरक्षिता हिने मत्सरग्रस्त होऊन तो वृक्ष उपटून टाकला. पण सम्राट अशोकांनी तो पुन्हा लावला. अशोकांची कन्या संघमित्रा हिने या बोधीवृक्षाची एक फांदी श्रीलंकेत नेली व तेथील अनुराधापुरा या ठिकाणी नेऊन लावली. इ.स.पू दुसऱ्या शतकात पुष्पमित्र शुंगने आणि इ.स. ६०० मध्ये शशांक राजाने बोधगयेतील बोधीवृक्ष पुन्हा तोडला होता.

चिनी प्रवासी झ्यूझांग यांने बोधीवृक्षाबाबत विस्ताराने लिहिले आहे. परंतु जेव्हा जेव्हा बोधीवृक्ष तोडला गेला तेव्हा प्रत्येक वेळी नवा बोधीवृक्ष त्याठिकाणी लावला गेला.

« PreviousChapter List