अध्याय १
' बंधन ' हा तीन अक्षरी शब्द कोणालाही आवडत नाही. असे कसे? आपण बघतो ह्या जीवनात की मला ते आवडते, त्याला तो आवडतो, हिला हे आवडत नाही पण ते आवडते असे वाक्य खूप वेळा ऐकायला मिळतात. म्हणजे आवडणे किंवा न आवडणे हे दोन्ही प्रकार, प्रत्येक गोष्ट, विषय, वस्तू इत्यादी सर्वांना त्यांच्या मन, विचार आणि संस्कारा प्रमाणे उठून दिसतात. पण ' बंधन ' हा एकच विषय अशी आहे की ९९ टक्के लोकाना न आवडणार आहे. म्हणून ह्या विषयावर खोलात जायचं विचार बरेच दिवसा पासून चालू होता. आज श्रीरामाने ते काम करून घेत आहे.