रोजची chatting सुरू झाली...सोबत कॉलेज ला येणं जाणं...
आसं आसंल तरी आम्ही फक्त दोघेच कधी वेगळ भेटलो नव्हतो...
एक दिवस plan झाला...भेटण्याची तारीख ठरली..जागा ठरली( वाशी मधील मिनी शिसोर)...वेळ सकाळी 9:30am -10am...
नेहमी प्रमाणे उशिरा गेलो होतो...ती येऊन माझी वाट बघत होती...
आम्ही ठरलेल्या ठिकाणी गेलो...आमच्यासाठी त्यात माझ्यासाठी सर्वकाही नवीन होतं...मी कधी मुलींसोबत जास्त बोललो नव्हतो...समजत नव्हत सुरवात कुठून करावी...
वैतागून तिनेच बोलायला सुरवात केली... सकाळी 10:00 am वाजता भेटलेलो आम्ही कधी 4:00 pm वाजले समजलंच नाही...
जाताना एकमेकांना आसं बघत होतो जस की त्या क्षणानंतर आम्ही कधी भेटणारच नाही...
तिला एक मिठी मारली...खरं तर सोडण्याची इच्छा नव्हती पण दुसरा पर्याय देखील नव्हता माझ्याकडे...