Bookstruck

शनी शिंगणापूर 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ वसलेल्या एक प्रमुख आणि जागृत क्षेत्र म्हणून शनि शिंगणापूर हे संपूर्ण महाराष्ट्नला परिचित आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले. अहमदनगरपासून 30 किलोमीटर अंतरावर नेवासे तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनिचे शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे शनिदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत. येथे श्रीशनैश्वराचे स्वयंभू जाज्वल्य देवस्थान असून शनैश्वराची मूर्ती ५ फूट ९ इंच उंचीची आहे. या मंदिरात असलेला दगडी स्तंभास शनिदेवाची मूर्ती मानली जाते. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी एका पुरात ही शिळा वाहत सोनई गावाजवळ आली. या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही. त्या रात्री शनिदेवाने एका गावकर्‍याला दृष्टांत देऊन 'मामा-भाच्यांनी मिळून माझी स्थापना करा', असा दृष्टांत दिला आणि गावकर्‍यांनी ती शिळा उभी करून तिची पूजा करण्यास प्रारंभ केला. विशेष म्हणजे हा देव उघड्यावरच एका चौथऱ्यावर आहे. देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य होय. एका व्यापार्‍याने नवस बोलल्यानंतर त्याला शनिदेव प्रसन्न झाल्याने त्याने शिळेभोवती चौथरा बांधला आहे. मूर्तीच्या डोईवर वृक्ष पण नाही. नजिकच्या लिंबाच्या वृक्षाची फांदी डोईवर आली तर ती गळून पडते. शनिदेवास निवारा आवडत नसल्याने या पाषाण शिळेवर कोणताही निवारा नाही. वर्षप्रतिपदा आणि वर्षातील प्रत्येक महिन्याचे चारही शनिवार येथे यात्रा भरते. शनी देवाला खूश करण्यासाठी येथे तेल वाहिले जाते. रोज हजारो लीटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते. शनि अमावास्या व गुढीपाडवा या दिवशी येथे मोठी यात्रा असते. शनि जयंतीस (वैशाळी अमावस्या) येथे उत्सव साजरा होतो.

« PreviousChapter ListNext »