@पहिले माणसांचे जिवन@
आज जर आपण पाहीले तर प्रत्येक व्यक्ती हा आप आपल्या कामात गुरफटलेला दिसतो. तो फक्त हाच विचार करत असतो की: मला कसे पैसे मिळतील?माझे भले कसे होईल?ह्याच्याही पलीकडे जाउन मी दुसर्याचा वापर माझ्या कामासाठी कसा करुन घेउ शकतो? असे अनेक विचार आत्ताच्या पिढीतील लोकांच्या मनात येत असतात.पण पुवीॆ असे नव्हते कारण पुवीॆ प्रत्येक व्यक्ती हा आपला तसेच ईतरांचाही विचार करित असे.पुवीॆचा व्यक्ती असा विचार करायचा कि! माझ्यामुळे ईतरांचे भले कसे होईल आणि त्याच्याबरोबर आपले संबंध कसे चांगले टिकुन राहतील.
आज शहरात राहणारी लोक सतत काम-काम करत असतात. तेथे निट कोणाच्या गाठीभेटी होत नाहीत .आपला शेजारी हा कोण आहे हे सुद्धा यांना माहीत नसत.याउलट तुम्ही कधी ग्रामिण भागातील एखाद्या खेडेगावात फिरायला जा तेव्हा समजेल पुवीॆचे लोक कसे होते.त्यांची संस्क्रुती कशी होती याचे दशॆन फक्त गावातच होते शेकडो वषाॆपुवीॆ ही सवॆ गावे स्वयंपुणॆ होती त्यांना कोणावरही अवलंबुन राहण्याची गरज नव्हती कारण त्या काळी अलुतेदार व बलुतेदार पद्धती होत्या.प्रत्येक माणुस आपल्याला पाहीजे असलेल्या सगळ्या गोष्टी सहज मिळवु शकत असे
जर संस्क्रुतीची गोष्ट सांगायची झाली तर मग त्यात काही वादच नाही.जर एखादा वाटसरु रस्त्याने जाताना घरी आला अन पाणि मागीतले तर त्या व्यक्तीला जेवन देउन झोपण्याचीही व्यवस्था पुवीॆचे लोक करत आणि ही प्रथा आज ही खेडेगावांत चालते.नाहीतर आपल्या शहरात पावशरची दुध पिशवी घेण्यासाठी 20 रुपये द्यावे लागतात पण गावात माञ तेच एक लिटर जरी असेलना तरी पैसे मागत नाहीत कारण त्यांच्यात स्वाथॆ नाही म्हणुन एकदातरी एखाद्या गावाला भेट देउन या म्हणजे जुन्या परंपरेचे दशॆन तुम्हाला नक्की होईल.