पार्श्वभूमी....
भारत, हिंदुस्थान, इंडिया, नावं जरी वेगवेगडी असली तरी या देशात विविधतेत एकता आढळते, त्याच मुख्य कारण काय अजुन कोणाला समजले नाही, याउलट ज्यांना समजले त्यांनी आपापल्या सोयीनुसार त्याचा अर्थ लावला, कोणी सांगतात भारतात खूप साऱ्या नद्या, पक्षी, प्राणी म्हणून, तर कोणी म्हणतात भारतात विविध जाती, प्रजाती, भाषा म्हणून विविधतेत एकता.
परंतु सर्वांचे मत एकत्र केले तरच आपण म्हणू भारतात विविधता आहे आणि त्या विविधतेत अर्धवट भारताची एकता. अर्धवट कारण इतिहास पहिला तर अखंड भारत म्हणजे काय ते फक्त चाणक्यच सांगू शकतात.आणि तुटलेला भारत देश एकत्र आणण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते म्हणजे सरदार वल्लभाई पटेल.चाणक्य यांनी अखण्ड भारताच स्वप्न चंद्रगुप्त मोर्यांच्या साथीनं पहिले आणि ते पूर्णही केले.परंतु परकीयांच्या सतत माऱ्याने हा देश खंडात विभागला गेला व बाहेरून आलेले लोक त्यांची भाषा,व्यंजन परंपरा भारताने कधी अंगीकृत केल्या आणि आपल्या कधी सोडल्या हे समजलेच नाही.
अश्याच परंपरांपैकी एक प्राचीन परंपरा भारतात होती आणि ती म्हणजे 'स्वयंवर'.
प्राचीन काळात स्वयंवर म्हणजे खूप मोठा लग्नाचा समारोह राजकुमारी आपला आवडला वर निवडायची.असाच एक स्वयंवर की ज्यातून स्वयंवराच्या चमत्कारी मोतीची व नक्षत्रात जन्मणाऱ्या मानवी मोतीची गाथा सुरु होते.