सुवर्णकाळ
सूर्य नभातुन वर येत होता, एखादे चिमणी चे पिल्लू
आपल्या आईच्या पंखातुन अलगदपणे बाहेर येण्याचा प्रयत्न करीत होते,त्या चिमणीच्या पिलासारखेच सूर्याचे किरणही त्या चिमणीच्या पंखात लपंडाव खेळत होते, सकाळचे नयनरम्य दृश्य ते पिल्लू आपल्या इवल्याश्या डोळ्यात भरून घेत होत त्यातच त्या पिलाची आई त्याला आपल्या पंखात घेण्याचा प्रयत्न करीत होती व चिवचिवाट करीत होती
इवल्या इवल्या तान्हुल्या माझ्या
का खेळतोस लपंडाव रे
पंखात तूझ्या शक्ती नाही तरी
का पळतोस भन्नाट रे
भारतात अनेक संस्थानांपैकी एक होते ' प्रबळगढ '
जसे नाव तसेच हे राज्य प्रबळ होते.