Bookstruck

कविता : तू जीवनात आला आणि असं वाटलं - प्रिया निकुम

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

तू जीवनात आला आणि तेव्हा  वाटलं ...

जीवन सगळं बदललं
तुझ्या आगमनात जरा जास्तच बहरलं
तुला पाहिल्यावर वाटलं
क्षणभर माझं हृदय हरवलं
पुढच्याच क्षणी मला ते
तुझ्या मनात दिसलं

तुझ्या येण्याने वाटलं
एक स्वप्न पूर्णत्वाला आलं
लाड पुरवायला हक्काचं कुणीतरी मिळालं

तुझ्या आगमनाने सुरु झाला
सोहळा नवीन आयुष्याचा
साजरा होईल प्रत्येक दिस
तुझ्या माझ्या नात्याचा

तुझ्या येण्याने सजीवता
मिळाली एका मूर्तीला
फुलाप्रमाणे नातसुद्धा
लागल  बहरायला

तू जीवनात आल्यावर वाटलं
अनेक जन्मच प्रेम माझ्या नशिबी आलं
तुझ्या रूपात ते माझ्यापर्यंत पोहचलं

तुझ्या येण्याने ह्या उचकीशी
एक नवीन नातं जुळलं
तूच आठवण काढत असशील म्हणून
भेटण्यास मन तेव्हा तेव्हा आतुर झालं

तुझ्या सहवासात जाणवलं
सगळं आहे जगात
एक हक्काचं घर मिळालं
मला तुझ्या मनात  

मला वाटलं तुझ्या रूपाने एक
तारा माझा झाला
कारण,माझी कविता ऐकून तो बघ
किती प्रेमाने गालात लाजला

तुझ्या येण्याने वाटलं
म्हतारपण देखील सुखात जाईल
काठीची गरज कशाला ?
जेव्हा  तुझी सोबत राहील

तू आल्याने वाटलं सर्व क्षण मी जगले
आता श्वासाने थांबु का?
म्हटलं तरी आनंदाने " हो " म्हटले

तू जीवनात आल्याने माझ्या
डोळ्यातील अश्रूंची जागा संपली
कारण, तुझ्या हर्षेची कळी
माझ्या आयुष्यात उमलली

तू जीवनात आला तेव्हा
निसर्गापासून  ते पशु-  पक्षांपर्यंत
सर्वानी तुझे निवासस्थानं विचारले
तेव्हा अभिमानाने मी प्रत्येकाला
बोट माझ्या हृदयाकडे दाखविले

म्हणूनच ; माझ्या प्रिया ,
 आज एकाच सांगणे तुला,
"मरण जरी आलं तरी
ते ऐटीत असावं
फक्त इच्छा एवढीच
मी तुझ्या मिठीत रहावं ". ..

(लेखिका: प्रिया निकुम)

« PreviousChapter ListNext »