Bookstruck

स्वशोधाची सुसंधी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

-    कांचन संपत शिंदे

मागील वर्षीच्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणू संबंधीत बातम्या येत होत्या.परंतु भारतात तोपर्यंत या विषाणू ने प्रवेश केलेला नव्हता. त्यामुळे त्याचा काहीही परिणाम इथे प्रत्यक्षरीत्या झालेला नव्हता. परंतु जानेवारी महिन्यात त्याचा भारतात प्रवेश झाला. आणि आपल्या शासनाने योग्य तो तो निर्णय घेतला आणि 25 मार्च ला पाहिले लॉकडाऊन जाहीर केले.

याचा परिणाम संपुर्ण देशावर,जगावर झाला. अनेक व्यवसाय,नोकऱ्या, धंदे, शैक्षणिक संस्था, बाजार,दुकान अचानक सगळं बंद झालं. याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर, देशावर झाला.

परंतु याची सकारात्मक बाजू बघता, आपल्याला प्रत्येकाला स्वतःच्या अंतरंगात डोकवण्याची संधी मिळाली,स्वतःच्या सुप्त कलागुणांना देण्यासाठी वेळ मिळाला.

मी औषधनिर्माणशास्त्र चे शिक्षण घेत आहे.महाविद्यालयाला सुट्टी मिळाल्यामुळे आनंद झाला.परंतु तो फक्त पहिल्या चार पाच दिवसंसाठीच नंतर तर वेळ जाता जात नव्हती. मग मी पुस्तके वाचायला सुरुवात केली. ई साहित्य या संकेतस्थळावर जाऊन मी वाचण्यासाठी अनेक पुस्तके डाउनलोड करून घेतली.

त्यात मी "फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी "हे पुस्तक वाचायला घेतले लेखक आशिष अरुण कर्ले यांनी या पुस्तकात औषधनिर्माणशास्त्र या विषयीची माहिती सर्वपरिचित व्हावी यासाठी खूप चांगला प्रयत्न केला

आहे. हे पुस्तक मला खूप आवडले.त्यानंतर मी

"बालगंधर्व व्यक्ती आणि कला "हे पुस्तक वाचत आहे.

मी सर्वाना देखील आवाहन करते की मराठी पुस्तके वाचली पाहिजे. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करावा.

अनेकांना वाचनाची आवड असते परन्तु आपल्या दैनंदिन जीवनात त्यांना वेळ मिळत नाही. त्यासाठी ही योग्य वेळ आहे आपल्या कलागुणांना वाव देण्याची.

या वेळेत मी स्वयंपाक करते. नवनवीन रेसिपीज करून बघते आहे. त्यातले काही प्रयोग फसतात देखील परंतु त्यातुन जी माजा मिळते ती वेगळीच आहे.

मला मराठी नाटक बघायला देखील खूप आवडते.

त्यामुळे मी नाटक देखील बघत आहे. या वेळेत मी अनेक नाटक पाहत आहे.

दिवसभरताला वेळ हा असा आणि घरातील काही कामे करण्यात निघून जातो. उरलेल्या वेळेत मी माझ्या कुटुंबाबरोबर अनेक खेळ खेळत असते. आज कितीतरी वर्षांनंतर मी हे खेळ खेळत आहे तेही सर्वांसोबत या निमित्ताने आम्ही एकत्र येत आहोत खेळतो,गप्पा मारतो,वेळ घालवतो ती माजा वेगळीच आहे.

इतर वेळी एकाच घरात राहून देखील आपण कधी एकत्र बसत नाही. निवांतपणे बोलत नाही. एकत्र असलो जरी तरी प्रत्येक जण आपापल्या मोबाईल खेळण्यात गुंतलेला असतो. त्यामुळे एकमेकांमधील संवाद कमी होत आहे.

आता पुरेसा वेळ मिळत असल्याने मी माझ्या अनेक जुन्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना फोन करून त्यांच्यासोबत बोलते.

या कोरोनाच्यासंकटकाळी मी सगळ्यांना सांगू इच्छिते की, आपल्या शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा.

नियमांचे उल्लंघन करू नका. लवकरच आपण सर्व भरतवासीय मिळून या संकटाशी लढू आणि यावर विजय मिळवू.

कोणताही प्रसंग, वेळ ही कायमस्वरूपी नसते.त्यामुळे जगावर जे संकट आलंय ते देखील एक दिवस निघून जाईल. या विचारणे रोज नवनवीन गोष्टी करत आनंदाने दिवस घालवत आहे

« PreviousChapter ListNext »