Bookstruck
Cover of माझी युरोप टूर

माझी युरोप टूर

by अनिल दातीर

यावेळी आम्ही 'पोलंड-स्लोव्हाकिया-हंगेरी' असा युरोप मधील तीन देशांचा दौरा आखला होता. मुंबईतून डायरेक्ट पोलंड फ्लाईट न मिळाल्याने अगोदर मुंबई ते दुबई आणि नंतर दुबई ते वॉर्साव (पोलंड) असा एकूण अकरा-बारा तासांचा प्रवास होता. मुंबईतून रात्रीचा प्रवास असल्याने विमानतळ सोडल्यानंतर लगेचच बाहेर जग सगळं अंधारात बुडून गेलं. दुबईत पोहोचो तर सकाळ झालेली होती. पुढची फ्लाईट लगेचच असल्याने पळत पळतच आम्ही त्या टर्मिनलला पोहोचलो. आतल्या आतच ट्रान्सफर असल्याने इमिग्रेशन प्रक्रिया तशी एकदमच सोपी झाली होती. लवकरच विमानात प्रवेश करत आम्ही आपापल्या सीट पकडल्या. मी अगोदरच विंडो सीट रिझर्व्ह करून ठेवली होती. दुबईहून निघालेलं विमान जसजसे पश्चिमेकडे जाऊ लागले तसतसे खाली दिसणाऱ्या करड्या, विराण टेकड्या मागे पडत होत्या. बराचवेळ या वैराण भागावरून प्रवास चालू होता, सौदी अरेबिया, इराक, सिरिया, टर्की, हा बराचसा भाग विमानातून करडा, रखरखीत दिसतो. विमानातील प्रत्येक सीटसमोर असलेल्या स्क्रीनवर हा प्रवास आपल्याला दिसत असतो. विमानाच्या छोट्या खिडकीतून मधेच कुठे एखादे शहर दिसत होते. आकाश निरभ्र असल्याने खालचा परिसर एवढ्या उंचीवरूनही भकास, विराण असलेला दिसत होता. पुढे पुढे हे दृश्य बदलून टेकड्यांच्या उंच भागावर साठलेले बर्फ दिसू लागले. आणि काही वेळाने सर्व काही धुक्यात हरवून गेले.

Chapters

Related Books

Cover of ढगांची फॅक्टरी

ढगांची फॅक्टरी

by अनिल दातीर

Cover of तल्लफ

तल्लफ

by अनिल दातीर

Cover of माझी स्पेन-पोर्तुगाल सफर

माझी स्पेन-पोर्तुगाल सफर

by अनिल दातीर

Cover of सफर रशियाची

सफर रशियाची

by अनिल दातीर

Cover of जीवाची मुंबई

जीवाची मुंबई

by अनिल दातीर

Cover of सफर इजिप्तची

सफर इजिप्तची

by अनिल दातीर

Cover of गोष्ट भुताच्या प्रेमाची

गोष्ट भुताच्या प्रेमाची

by अनिल दातीर

Cover of माझी भटकंती

माझी भटकंती

by अनिल दातीर

Cover of सटीची जत्रा

सटीची जत्रा

by अनिल दातीर