Bookstruck

पद्धत ....

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

प्रेम असो वा राग असो..
महत्त्वाची असते ती व्यक्त करण्याची पद्धत ...

जर कुणी आपल्यावर रुसलं असेल..
तर महत्त्वाची असते ती मनावण्याची पद्धत..

जर कुणाचे मन जिंकायचे असेल ..
तर महत्त्वाची असते ती विचार पटवून देण्याची पद्धत..

जर कुणाला शुभेछा द्यायच्या असतील..
तर महत्त्वाची असते ती शब्दांतून गोडवा मांडण्याची पद्धत..

जर कुणाला दुःखातून सावरायचे असेल..
तर महत्त्वाची असते ती धीर देण्याची पद्धत..

जर कुणाचा गैरसमज दूर करायचा असेल..
तर महत्त्वाची असते ती शंकानिरसन करण्याची पद्धत..

जर कोणते नाते टिकवायचे असेल...
तर महत्त्वाची असते ती त्या नात्याचे हळुवार संगोपन करण्याची पद्धत..

आयुष्यातील आनंद सदैव जोपासायचा असेल..
तर महत्त्वाची असते ती इतरांपर्यंत तो आनंद पोहोचवण्याची पद्धत...

« PreviousChapter ListNext »