Bookstruck

रंग माझा वेगळा ..

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सप्तरंगांचा इंद्रधनू..
रंगांची गोड मांदियाळी जणू...

लाल रंग म्हणे मान माझा पहिला..
करतो मी साजरा प्रेमाचा सोहळा..

नारंगी रंग करी दुसऱ्या मानाचा आग्रह..
हा वर्ण आहे बुद्धीचा भव्य संग्रह..

आता मात्र येते पिवळ्या रंगाची बारी..
आनंदात असते कायम याची स्वारी..

चौथ्या पदावर असल्याचे नाही वाटत याला खिन्न..
हिरवा रंग आहे भरभराटीचे चिन्ह..

पाचव्या स्थानी आहे निळ्या रंगाचे वास्तव्य..
या रंगाचे विशेष म्हणजे याचे थोर दिव्य..

पाठोपाठ येतो पांढऱ्या रंगाचा रथ..
याची एकुलती एक वाट म्हणजे सुख समाधानाचे पथ..

अखेर जांभळ्या रंगाचे आहे निराळे महत्त्व..
याची मूळ ओळख म्हणजे याचे स्वामित्व..

निसर्गाचा हा जणू चमत्कारच आगळावेगळा..
प्रत्येक रंग म्हणतो रंग माझा वेगळा...

« PreviousChapter ListNext »