Bookstruck

आइसलँड येथील हौकडलूर दरीतील गिझर आहे तरी काय?

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

हौकादलूर दरी हे गोल्डन सर्कल मार्गातील एक सर्वाधिक लोकप्रिय ठिकाण आहे. कारण, यामुळे पर्यटकांना गिझर पहाण्याची संधी मिळते. त्या क्षेत्रातील त्यापैकी दोन आहेत: गेयसीर आणि स्ट्रोककूर, तसेच 40 हून अधिक लहान गरम झरे, चिखलाची भांडी आणि फ्यूमरॉल्स देखील येथे आहेत. हा परिसर सुमारे 100 मीटर रूंद आहे आणि अर्ध्या किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे.

https://qphs.fs.quoracdn.net/main-qimg-13578697b08d5969fd7bf5f791e2fc15

"गीझर" हा शब्द युरोपियन सर्वात जुन्या गिझर - गीझिरकडून आला आहे. हे गीझर कधी बनले याचे विशेष पुरावे नाहीत, परंतु काही तज्ज्ञांच्या मते ते 13 व्या शतकात हे अस्तितीवर आले असावेत. 19 व्या शतकाच्या अखेरीपर्यंत गेयसीर मोठ्या प्रमाणात सक्रिय होते, सध्या जरी ते आधीप्रमाणे सक्रिय नसले, तरी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात.

गेयसीर

गरम पाण्याचा उगम असणाऱ्या दोन झऱ्यांपैकी मोठे म्हणजे गेयसीर (जुन्या नॉर्स शब्दाच्या 'गश' या शब्दापासून बनविलेले) हा उष्ण झरा 1916 पासून शांत झाला होता. परंतु 2000 मध्ये 122 मीटरपर्यंत पोहोचलेल्या सर्वाधिक गिझर स्फोटाचा विक्रम त्याने केला. सध्या हा उकळत्या पाण्याचा एक शांत तलाव आहे, सुप्त असला तरी कदाचित भविष्यात दुसर्‍या क्षणी आणखी एक मोठा स्फोट होऊ शकेल.

स्ट्रोककूर

स्ट्रोककूर हे या परिसरातील मुख्य नैसर्गिक आकर्षण आहे. हे गेयसीरपासून अंदाजे 100 मीटर अंतरावर असून, दर दहा मिनिटांनी फुटते आणि पाण्याचा उंच फवारा उडतो, उकळत्या पाण्याचा फवारा 30 मीटरपेक्षा जास्त उंच असू शकतो.

या दोन प्रसिद्ध गिझर्सपेक्षा येथे बरेच काही आहे, हौकादलूर दरी ही एक भौगोलिक क्षेत्र आहे ज्यामध्ये गरम आणि थंड झरे, बुडबुडे येणारे चिखल, वाफवणारे फ्यूमरोल्स आणि उबदार प्रवाह आहेत. जवळच असलेल्या लॉगरफजॉल पर्वतापासूनचे गिझर्सवरील दृश्य विहंगम दिसते.

https://qphs.fs.quoracdn.net/main-qimg-ad42ae7b149d6dea5c596fc131251478

ही दरी आइसलँडच्या उत्तरेकडील भागात आहे आणि प्रसिद्ध गल्फफॉस धबधबा आणि थिंगवेलर राष्ट्रीय उद्यानापासून 10 किमी अंतरावर आहे.

« PreviousChapter ListNext »