Bookstruck

समुद्रातील काही गुढ रहस्य: मृत समुद्र जिथे माणूस बुडत नाही

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मृत समुद्र हा जगातील सर्वांत छोटा आणि कमी क्षेत्रफळावर पसरलेला इझ्राएल-जॉर्डन या देशांच्या दरम्यानचा एक समुद्र आहे. हा समुद्र ६५ किलोमीटर लांब आणि १८ किलोमीटर रुंद आणि १३७५ फूट खोल आहे. मृत समुद्राला पृथ्वीचा सर्वांत खालचा बिंदू मानले जाते. या समुद्राला जॉर्डन नदी आणि इतर छोट्या नद्या येऊन मिळतात. हा जगातील सर्वाधिक क्षारता असलेला (साधारण इतर सागरजलापेक्षा ७ ते १० पटींनी अधिक क्षारता) समुद्र आहे. भूरचनादृष्ट्या हा समुद्र जॉर्डनच्या भल्या मोठ्या खचदरीचा भाग आहे. शास्रज्ञांच्या मते तृतीयक कालखंडातील पृथ्वीच्या हालचालींमुळे या समुद्राची निर्मिती झाली असावी, हे याच्या पूर्व आणि पश्चिम बाजूंस असलेल्या डोंगररांगांच्या तीव्र कड्यांच्या अभ्यासावरून दिसून येते. बायबलच्या जुन्या करारात खारा समुद्र, पूर्व समुद्र, मैदानी समुद्र, मृत्यूचा समुद्र अशी नावे या समुद्राला दिलेली आढळतात.

https://qphs.fs.quoracdn.net/main-qimg-9a641dd0ca03cbfc6e0f0dfddcc18016

प्रत्येक समुद्राचं पाणी खारटच असतं, पण मृत समुद्राचे पाणी इतर समुद्राच्या तुलनेत ३३% अधिक खारट आहे. ह्या कारणामुळेच या पाण्यात जलचारांचे अस्तित्व देखील आढळत नाही. या समुद्रात क्षाराचे - मीठाचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे मृतसागरातील पाण्याचे घनत्व अधिक आहे. त्यामुळे या समुद्रात कोणीही कितीही प्रयत्न केला तरी बुडत नाही. पण फक्त इथेच इतक्या मोठ्या प्रमाणावर क्षार का आहे, या प्रश्नाचे उत्तर अजून देखील मिळालेले नाही.

« PreviousChapter ListNext »