Bookstruck

सारीकाची कैफियत

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आम्ही तांत्रिक क्रिया पुढे चालू ठेवली.

तिसऱ्या कवटीचा दिवा खूप वेगाने जळत होता. आम्ही त्याच्याकडे पाहिले आणि नामजप करायला सुरुवात केली. काही क्षणानंतर सारिकाचा आत्माही आरशात दिसला. मध्यम आकार, गोरा रंग, मोठे स्वप्नाळू डोळे, तिच्या  चेहऱ्यावर दुःखाची आणि वेदनेची संमिश्र छाया होती जणू करुणेचे मूर्त स्वरूपच. ती म्हणाली,

“माझ्या होण्याऱ्या पतीच्या जागी एक भयानक आणि बीभत्स नर-सांगाडा पाहून मी लगेचच बेशुद्ध पडले आणि त्यानंतर केव्हा, कोणत्या वेळी माझा  मृतदेह त्या अवस्थेत सोडला गेला, मला माहित नाही.

सारिका पुढे म्हणाली, "तेव्हापासून आजपर्यंत माझा आत्मा त्याच अघोरी साधूच्या तावडीत आहे. तो मला नको असलेले वाईट काम करायला लावतो. कदाचित मीही दहा वर्षांनंतर मुक्त होईन."

यावेळी तो साधू कुठे आणि कोणत्या वेशात आहे,  मी विचारल्यावर सारिकाने मला सांगितले "यावेळी तो मुंबईत तर कधी पुण्यामध्ये राहतो. तो तंत्र-मंत्राच्या नावाने भरपूर पैसा आणि प्रतिष्ठा कमावत आहे. त्याच्या तंत्र-मंत्र  विद्येमागे माझ्याशिवाय इतर अनेक असहाय आत्मे काम करतात. त्याच्या तावडीत किती आत्मे सक्तीने अडकले आहेत माहित नाही.”

जेव्हा मी विचारले की त्याने स्वत:चे  नाव आता काय ठेवले आहे, तेव्हा सारिकाने सांगितलेले नाव ऐकून मला धक्का बसला. मी सहसा यावर विश्वास ठेवत नाही. मला त्या नावाची आणि त्या नावाच्या व्यक्तीची चांगली ओळख होती.

एक मोठे रहस्य मला उघड झाले. त्याचे नाव होते ‘महेंद्रनाथ सद्गुरू’

 

« PreviousChapter ListNext »