Bookstruck

मिठी मारण्यासाठीचा आशीर्वाद

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एके दिवशी, मी आणि ती एका अनावश्यक करणासाठी भांडलो. दोन सिगारेट पेटवून मी तणावातून मुक्त झालो. पण तरीही ती खिन्नपणे रागात उभी होती. ती थोडी रागावली की खूप सुंदर दिसते. पण आज भयंकर रागात ती कालीमाते सारखी दिसत होती.

तिच्या डोळ्यांतल्या रागाने मी घाबरलो आणि गप्पच राहिलो.मग मी तिच्याशी जरा फ्लर्ट करायला सुरुवात केली. माझ्या खोडकर बोलण्याने तिचा राग आणखी वाढला. आता काय करावे आणि काय बोलावे ते समजत नव्हते. मी तिला जोरात मिठी मारली आणि म्हणालो,

"रागारागात आपल्या प्रेमाचा बळी देऊ नकोस. जर तू असे केलेस तर आपल्याला मूल होणार नाही. आणि एक अवतारी अपत्य जन्माला घालण्याच्या प्रक्रियेत मोडता घातलास म्हणून तुला पाप लागेल."

हे ऐकताच ती एकदम हसू लागली तिने माझ्या छातीवर एक दोन बुक्के मारले, माझे  चुंबन घेतले आणि पुन्हा माझ्या मिठीत पर्यायाने आयुष्यात प्रवेश केला..

« PreviousChapter ListNext »