Bookstruck

चवदार तळ्याचे पाणी नव ...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

चवदार तळ्याचे पाणी

नव शक्‍ती मनुजा आणी

या शक्‍तीमागे मूर्ती

भीमकाय देई स्फूर्ती

जणू मुक्यास दिधली वाणी

चवदार तळ्याचे पाणी

तेजाब जलाचे झाले

दीनांना प्रेरित केले

अन्यायासाठी लढुनी

नव शक्‍ती मनुजा आणी

नाकारुन परंपरेला

स्वीकारुन मानवतेला

करुणेची आर्त विराणी

चवदार तळ्याचे पाणी

हो, हक्क आम्हां जगण्याचा

मंदिरांमध्ये येण्याचा

जाळा ती स्मृती पुराणी

चवदार तळ्याचे पाणी

आत्मभान जागे केले

मानवास मीपण दिधले

धम्मचक्र ये परतोनी

नव शक्‍ती मनुजा आणी

चवदार तळ्याचे पाणी

नव शक्‍ती मनुजा आणी

« PreviousChapter ListNext »