Bookstruck

स्वातंत्र्याच्या संग्रामा...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

स्वातंत्र्याच्या संग्रामात धन्यबाबू तू सुभाष

तुझ्या चरित्राला आहे एक सोनेरी सुवास

योग, अध्यात्म, ईश्‍वरी साक्षात्काराची ही ओढ

शोध गुरुचा घ्यावया बालमन घेई वेड

उच्च शिक्षणानंतर घेशी स्वातंत्र्याचा ध्यास

क्रांतिकारकांचा जेव्हा चढे जोर आंदोलना

तेव्हा होई तुझी साथ प्राण लावूनिया पणा

तुझ्या भिन्न मतांमुळे घडे नवा इतिहास

कधी एकांती राहूनी तुझे चाले देशकार्य

ब्रिटिशांशी दयाया झुंज असामान्य तुझे धैर्य

झियाउद्‌दीन होऊनी केला काबूल प्रवास

मायभूमीची मुक्‍तता होते एक स्वप्‍न मनी

साकाराया ते पाठिशी हिटलर, मुसोलिनी

होती दूरदृष्‍टी, ध्यास, योजकत्‍व सोबतीस

तू आझाद हिंद सेना स्थापियलेली नव्याने

सरसेनापतीपद स्वीकारले तू मानाने

’दया हो रक्‍त , घ्या स्वातंत्र्या’ याचा दिलास विश्‍वास

युद्‌धरंग पालटला झाली स्वप्नांची समाप्‍ती

पुढे पुढे नैसर्गिक सुराज्याची वाढे व्याप्‍ती

दृष्‍ट लागे कृतांताची उंबरच्या या फुलास

« PreviousChapter ListNext »