Bookstruck

आम्ही पाखरे मुठीत आमुच्या...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आम्ही पाखरे मुठीत आमुच्या

ठेवा स्वच्छंदाचा

उभ्या जगाला भरवू चारा

आम्ही आनंदाचा......

आम्ही चढवितो तुमच्यासाठी

घरटयावरती झूल

आम्ही फुलवितो तुमच्यासाठी

वात्सल्याची वेल

आम्हीच येतो रंग निरागस

घेऊन पोरवयाचा......आनंदाचा

कुण्या शांतीदूताच्या हृदयी

आम्ही फुलवितो फूल

आम्ही पटवितो अहिंसेतल्या

कारुण्याची खूण

आम्हीच देतो भास निरंतर

येशूच्या जन्माचा......आनंदाचा

नाविन्याच्या नभात आम्ही

घेतो उंच भरारी

उपदेशाच्या अंगणातली

मुलेच धडपडणारी

आम्ही तळपतो सूर्य होऊनी

नित्यच नव्या युगाचा......आनंदाचा

आम्ही पाखरे ......

« PreviousChapter ListNext »